मराठी चारोळ्या

Pages

शिवधर्माचे तेज पुन्हा उजळू दे {पोवाडा}

Saturday, December 4, 2010

शिवधर्माचे तेज पुन्हा उजळू दे {पोवाडा}

जुलै १९९९ मध्ये कारगिल युद्ध प्रसंगी प्रसिद्ध झालेली रचना :

ऐका, ऐका मर्द गड्यांनो,
वैभव शिवसृष्टीचे,
स्वकीया-परकीयासही कळू दे,
शिवधर्माचे तेज पुन्हा उजळू दे || धृ.||

जरी म्हणती भाई भाई,
परि तेथं भरवसा नाही,
बुरखे तयांचे ढळू दे,
शिववाणीचे तेज पुन्हा उजळू दे || १ ||

सीमेस दुश्मन खेटले,
संग्राम कधीचे पेटले,
दाऊनि पाठ, शत्रू पळू दे,
शिवपवाड्याचे तेज पुन्हा उजळू दे || २ ||

आम्ही रमलो मौजमजेत,
संधिसाधू घुसले घरट्यात,
कुटील हेतू तयांचे उधळू दे,
शिवस्फुरणाचे तेज पुन्हा उजळू दे || ३ ||

अहिंसेवर ठेउनी मदार,
कितीतरी जाहले करार,
नाते वृथा मैत्रीचे निखळू दे,
शिवस्वातंत्र्याचे तेज पुन्हा उजळू दे || ४ ||

इतिहास आपुला लढण्याचा,
वीरश्रीने बाहू स्फुरण्याचा ,
भीतीने अधम चळचळू दे,
शिवयोद्ध्यांचे तेज पुन्हा उजळू दे || ५ ||

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP